Author: Kapilraje Nangare

“एक क्षितिज” या नावाने आपले स्वत:ची एक आगळी वेगळी ओळख करून देणारा हे कपिलराज रमेशकुमार नांगरे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या यांचे कुटुंब तसे बघायला गेले तर सर्वसामान्य, मध्यमवर्गीय विचारांशी तारतम्यता बाळगून राहणारे. पण जगणं शिकले ते आईने त्याच्यासाठी घेतलेल्या मेहनतीतून. मग त्यानंतर प्रत्येक बारीक सारिक गोष्टीकडे त्यांचा बघण्याचा दृष्टीकोण बदलला. समाज, शिक्षण, नाती, मैत्री, राजकारण यांबाबतीत अनेक प्रश्नचिन्ह मनात असल्या कारणाने त्या प्रश्नांचा दूरगामी विचारसरणीच्या लोकांकडून उत्तरे घेण्याचा त्यांचा प्रयत्न अजूनही चालूच आहे पण ती शोधत असताना डोक्यात जे विचारांचं द्वंद्व निर्माण होत गेले अन त्यातून जे निष्कर्ष बांधले गेले त्यातूनच “एक क्षितिज” ची मुहुर्तमेढ रोवली गेली. मग विविध वर्तमान पत्रातून तसेच लेखन स्पर्धेतून ही विचारांची शृंखला विस्तारतच जात आहे. पण आज एकत्रितपणे पाहताना अस लक्षात येते की, अजाणतेपणी या सर्वांतून त्यांच्याकडून साहित्याचा एक सामग्र धांडोळा घेतला गेला आहे. शब्दांच्या माध्यमातून अर्थछटांच भान राखून विविध भावविश्वान्ना स्पर्श करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. या सर्व गोष्टींची सुरवात आणि शेवट तरुणाईच्या विविध्यपूर्ण राहणीमान, विचारसरणी, जगण्यातली लय, वागण्यातली लकब आणि भ्रमनिरासाची अखंडित मालिका या सगळ्यांशी होताना आढळला. म्हणूनच विसकटलेल्या, पळून गेलेल्या तरुणाईच्या डोळ्यातून पाहताना “एक क्षितिज” च्या माध्यमातून माणसाची मूल्यधिष्टीत प्रकृती, वृत्ती, कृती निश्चित करण्याचा प्रयत्न “कपिलराज नांगरे” करत आहेत.
लेख

सृष्टीशी माझे नाते

(येथे माणूस आपले आत्मवृत्त कथन करत आहे, तो सृष्टी आणि त्याच्या नात्यातला गोडवा, प्रेम आणि राग व्यक्त करत आहे.)   “बा आदब, बा मुलाहिजा, होशियार” अशी आगमनाची वार्ता मी…

लेख

मराठी राजभाषा दिन

कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने २७ फेब्रुवारी हा दिवस राज्यात “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो. ज्यांनी मराठीला सौंदर्यपूर्ण साज चढवला अशा…

सत्यवचन

अपतनीय सत्य

वादंग केल्याने कोण मोठा होत नाही आणि कोणी बरोबरही ठरत नाही, हा समोरचा एकवेळ परिणामाच्या भितीने मौन धारण करेल पण म्हणून वादंग घालणारा सत्य…

सत्यवचन

बुद्धी

जी बुद्धी बंधनात काम करते ती स्वतंत्र बुद्धी अन् जी बंधनाला न जुमानता काम करते ते स्वैराचारी बुद्धी होय. आपण विषयावर प्रचंड प्रेम करतो…

लेख

युवकांचा दीपस्तंभ शहीद भगतसिंग

“भारतमातेसाठी इतिकर्तव्य संपले. आमच्या बलिदानाने शेकडो युवक पेटून उठले पाहिजेत. त्यांनी आमुचे अपुरे क्रांतिकार्य वेगाने व नेटाने चालवावे. मी खुशीने फासावर लटकुन जगाला दाखवून…

लेख

माझ्या सर्व तरुण बहीणींसाठी

नमस्कार ! मी तुम्हा सर्वांचा भाऊ. असं म्हणतात की, एका विचारानं अनेक विचारांचा सोहळा निर्माण होण्यास सुरुवात होते. ‘मी एकटाच’ मला भाऊ नाही आणि…