लेख

मराठी राजभाषा दिन

कविवर्य कुसुमाग्रज

यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने २७ फेब्रुवारी हा दिवस राज्यात “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो. ज्यांनी मराठीला सौंदर्यपूर्ण साज चढवला अशा कुसुमाग्रजांचा म्हणजेच वि.वा.शिरवाडकरांचा जयंतीदिन हा “भाषादिन” म्हणून साजरा करणे ही आपल्यासाठी अभिमानाचीच बाब आहे पण खरचं हा “प्रतिकात्मक मराठी भाषा दिन”“मराठीची व्याप्ती वाढवतोय का…?” मराठी भाषा ही आपल्या जीवनातील विविध व्यवहार क्षेत्रामध्ये मग ते शिक्षण असेल वा उच्च शिक्षण असेल, तंत्रज्ञान असेल किंवा न्यायव्यवहार असेल या सर्वच ठिकाणी मराठी भाषा वापरण्याची प्रेरणा मिळणे हे या “मराठी भाषा दिनाचे” अवचित्य आहे. आपण पंधरवडा साजरा करतो, महाराष्ट्र दिन साजरा करतो या १७ दिवसांच्या व्यतिरिक्त वर्षामध्ये ३४८ दिवस आहेत, या दिवसांमध्ये आपली मराठीबद्दल ची धारणा काय आहे? मराठी भाषा दिनानिमित्त आपण मराठी कविता वाचत असू पण जर आपल्या आयुष्यात मराठी पुस्तकच जर नसेल, आपल्या भागातील मराठी वाचनालये बंद पडत असतील, मराठीसाठी काम करणार्‍या ज्या काही यंत्रणा आहे त्या आपण जर सक्षम करण्यास असमर्थ असू,तर आपण फक्त प्रतिकात्मक व्यवहार करू. मराठी माणसाने प्रतिकात्मक व्यवहार करण्यापासून ते मराठी भाषेच्या गाभ्यापर्यंतच्या व्यवहारापर्यंतचा प्रवास हा मोठा होत चालला आहे, जी खूप मोठी शोकांतिका आहे. आणि जर खरच आपण जर हा मराठी भाषेच्या गाभ्यापर्यंतच्या व्यवहार सक्षमपणे करू लागलो ना तर वि.स.खांडेकर यांच्यापासून ते भालचंद्र नेमाडे यांच्यापर्यंत चार ज्ञानपीठ पुरस्कार या जे मराठी भाषेला मिळाले आहेत, ते आणखी मोठ्या प्रमाणात मिळतील आणि साहित्यव्यवहारापलीकडचा जो प्रचंड भाषाव्यवहार आहे जे आपल्याला गूगल वर पहायला मिळतं, विकिपिडिया वर दिसतं, इंटरनेटच्या विविध क्षेत्रांमध्ये दिसतं तिथं आपल्या भाषेचं अस्तित्व दिसलं पाहिजे कारण तिथं जर आपली भाषा दिसली नाही त्याबरोबरच भाषातज्ञांच्या मते मराठी ही व्यवहाराची, रोजगाराची, आणि नव्या ज्ञानाची भाषा जर झाली नाही तर आपली भाषा ही केवळ कथा,कादंबर्‍यांचीच भाषा बनून जाईल या प्रकारच्या अज्ञानामधून, अनास्थेमधून बाहेर पडण हे कुसुमाग्रजांच स्मरण करण्याचा चांगला मार्ग आहे.

Leave a Reply