आपले दु:ख, वेदना यांच्यावर मात करायची म्हणजे सुख, आनंद यांचे स्वागत पण बोलणं जितंक सोप हे घडणं तितकच अवघड हेही सत्यच आहे म्हणा; पण मित्रहो, यावर मात करण्यासाठी आपल्याकडे पाहिजे फक्त आशा म्हणजेच HOPES अतिविचारांती ही बाब नक्कीच लक्षात येईल.
“एक क्षितिज” या नावाने आपले स्वत:ची एक आगळी वेगळी ओळख करून देणारा हे कपिलराज रमेशकुमार नांगरे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या यांचे कुटुंब तसे बघायला गेले तर सर्वसामान्य, मध्यमवर्गीय विचारांशी तारतम्यता बाळगून राहणारे. पण जगणं शिकले ते आईने त्याच्यासाठी घेतलेल्या मेहनतीतून. मग त्यानंतर प्रत्येक बारीक सारिक गोष्टीकडे त्यांचा बघण्याचा दृष्टीकोण बदलला. समाज, शिक्षण, नाती, मैत्री, राजकारण यांबाबतीत अनेक प्रश्नचिन्ह मनात असल्या कारणाने त्या प्रश्नांचा दूरगामी विचारसरणीच्या लोकांकडून उत्तरे घेण्याचा त्यांचा प्रयत्न अजूनही चालूच आहे पण ती शोधत असताना डोक्यात जे विचारांचं द्वंद्व निर्माण होत गेले अन त्यातून जे निष्कर्ष बांधले गेले त्यातूनच “एक क्षितिज” ची मुहुर्तमेढ रोवली गेली. मग विविध वर्तमान पत्रातून तसेच लेखन स्पर्धेतून ही विचारांची शृंखला विस्तारतच जात आहे. पण आज एकत्रितपणे पाहताना अस लक्षात येते की, अजाणतेपणी या सर्वांतून त्यांच्याकडून साहित्याचा एक सामग्र धांडोळा घेतला गेला आहे. शब्दांच्या माध्यमातून अर्थछटांच भान राखून विविध भावविश्वान्ना स्पर्श करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. या सर्व गोष्टींची सुरवात आणि शेवट तरुणाईच्या विविध्यपूर्ण राहणीमान, विचारसरणी, जगण्यातली लय, वागण्यातली लकब आणि भ्रमनिरासाची अखंडित मालिका या सगळ्यांशी होताना आढळला. म्हणूनच विसकटलेल्या, पळून गेलेल्या तरुणाईच्या डोळ्यातून पाहताना “एक क्षितिज” च्या माध्यमातून माणसाची मूल्यधिष्टीत प्रकृती, वृत्ती, कृती निश्चित करण्याचा प्रयत्न “कपिलराज नांगरे” करत आहेत.