कविता

काय देवा बघतोयस ना…..?

काय देवा बघतोयस ना…..?

अरे, दगडाला देवपण देणारा, देव विकून पैसे घेतो आणि खोऱ्यानं लोकांना बुडवणारा दांडगा मानव त्याच देवाला पैसे दान करतो.

इथे भूतांच्या दंतकथांच्या भितीने पैसेवाली राहतं घर सोडतात आणि भुकेच्या काहुरीने विव्हळणारे  स्मशानात पण जायला घाबरत नाही.

काय देवा बघतोयस ना….?

इथे दररोज होणारे खून, दरोडे, बलात्काराच्या बातम्या वर्तमानपत्रात पृष्ठपानावर जातात आणि एखाद्या गरीब घरच्या मुलाचे यश मात्र आतल्या तिसऱ्या-चवथ्या पानाच्या खालच्या कोपऱ्यात छापतात

अरे, इथे तुझ्या नावाने बुवाबाजी करणारे राम रहीम, आसाराम गल्लोगल्ली भेटतील आणि त्याच्याकडे पैसे देऊन, हात पसरुन जाणारे लोक भरपूर आहेत

पण कोणीही दखल न घेतलेल्या, अन् स्वत:च्या मेहनतीने संसार करणाऱ्या एखाद्या सच्च्या कलाकाराच्या घरातली बिकट अवस्था पहायला जाताना हातात लोकांच्या दोन दिवसांनी कोमेजणाऱ्या गुलाबाच्या फुलाशिवाय काहीच नाहीयं.

काय देवा बघतोयस ना….?

अरे, पोट भरुन भरुन डायटिंग करणारी लोकं सकाळी वजन कमी करण्यासाठी धावताना दिसतील, पण हाडाची काडं झाली असताना घराला आधार देण्यासाठी पहाटे पासून सायकल मारणारे पेपरवाले काका सगळ्यांन पेक्षा फास्ट धावताना दिसतील.

काय देवा बघतोयस ना…..? कधी बदलणारं रे ही लोकं….?

पैसा मिळवण्याच्या नादात माणुसकीलाच बदनाम करत आहेत ही लोकं.

पुन्हा एकदा अवतार घेण्याची गरज आहे तुला

अद्दल घडवं यांना म्हणजे ठिकाणावर येईल यांचं डोकं…!

अद्दल घडवं यांना म्हणजे ठिकाणावर येईल यांचं डोकं…!

कपिलराज नांगरे (एक क्षितिज)

 

Leave a Reply