“स्वप्न”
“स्वप्न” चांगलं म्हणलं तर गोड आठवण
“स्वप्न” वाईट म्हणलं तर वेळ बरोबर नव्हती
“स्वप्न” येणं आणि ते बघणं आपल्या हातात मुळीच नाही पण
“स्वप्न” जगणं किंवा आठवण बनवणं नक्कीच आपल्या हातात आहे
“स्वप्न” पूर्ण व्हावं ही अपेक्षा करणं बरोबर आहे पण
“स्वप्नांचा” पाठलाग करताना भान ठेवणंही तितकेच गरजेचं आहे
“स्वप्न” साकार करणं जरी आपल्या हातात असलं/नसलं तरी पण
स्वप्न “जगणं” आपल्या हातात आहे
मग ते आपल्यासाठी असो किंवा दुसऱ्यासाठी
परिणाम अन् पूर्णता यांची तमा न बाळगता
निरपेक्ष अन् निस्वार्थी सह्रदयानं फक्त “आनंदासाठी”-
“स्वप्नं” जगण्यात जी मजा आहे ना त्याचा आस्वाद खरंच अवर्णनीय….!
“स्वप्न” काही भंगतातही
पण
आपण एक गोष्ट विसरता कामा नये की, अमावस्या एका रात्रीपुरतीच असते, पुन्हा दुसऱ्या सकाळी सूर्याेदय होतोच..!
आज अपूर्ण राहिलेलं “स्वप्न” कदाचित आपण “समोरच्या” व्यक्तीच्या डोळ्यात पण पाहू शकतोच ना…?
तीच धडपड, तीच “स्वप्न जगायची” हिंमत आपण समोरच्या व्यक्तीसाठी लयास लावली तर…??
मित्रहो, “स्वप्न” हे कोडं आहे
समजलं तर “वास्तव” आणि नाही समजलं तर “घटना”
आपण काय करु शकतो? तर
आपण “संस्कारक्षम हातांनी अनेक स्वप्नांना सक्षम बनवू शकतो”
🖋माझ्या लेखणीतून…..!
“एक क्षितिज”
-कपिलराज नांगरे