आपण अनोळखीच एकमेकाला तसे… पण
आपण लोकांना भेटतो..
संवाद साधला जातो..
कधी हास्याचे फवारे उडले जातात..
तर
कधी नकळत दु:खाचे ताशेरे छेडले जातात..
एका क्षणाला तर..सगळं कसं अगदी “सेट” असल्यासारखं जाणवतं
बर्थडे पार्टी, फ्रेशर्स पार्टी, ट्रॅडिशनल डे आणि नानाविध डे साजरे करताना होणारा “कल्ला” आयुष्यातले अमुल्य क्षण बनून जातात..
दसरा, दिवाळीत फराळावर ताव मारणे सुद्धा एकप्रकारचा डेच…!
फ्रेंडशिप डेला तर मित्रत्वाच्या गाठी अधिकच घट्ट बांधल्या जातात..
किती विस्तीर्ण आणि मनमोहक अन् कधीच संपू नये अशी ही मैत्रीची वेल आहे ना..?
काहींना कळते,
काहींना उमगते,
काहींना भावते,
काहींना फुलते,
थोडक्यात काय तर “मैत्रीची व्याख्या क्षितीजाप्रमाणे विस्तारते.”
काही मैत्र बंधांचे नात्यातही रुपांतर होते बरं का…!
‘बहिण-भाऊ’,’जी.एफ-बी.एफ’ काही जण काहींचे “मेंटाॅर” बनतात तर काहीजण “आयडाॅल”
पण
हा ऋणानुबंध, हा जिव्हाळा, ही रक्तनात्याहून अधिक प्रेमळ भासणारी मैत्री फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून असते,
त्याच गोष्टीमुळे अनेक अबोल भावनांना एक व्यक्तमंच प्राप्त होतो..
आणि ती गोष्ट म्हणजे #विश्वास….!
न बोलता फक्त जाणवणारा असा हा #विश्वास….!
न व्यक्त होता फक्त ह्रदयात समोरच्याची आपली जागा निर्माण करणारा हा #विश्वास….!
मी विश्वासा बद्दल बोलण्याइतपत मोठा नाही, या अथांग भावनाप्रधान जनसमुदातला मी एक छोटासा मिणमिणता काजवाच…!
पण अनुभव – व्यथा – कथा यांच्या दाट झाडीतून विश्वासाच्या सूर्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय….!!!
काय पटतंय ना……???
– एक क्षितीज
– कपिलराज नांगरे