बालपण,तरुणपण,वार्धक्य या बिनचाकाच्या पण तितक्याच वेगवान गाडीमधला प्रवास म्हणजे “संपूर्ण आयुष्य”….!
ही आयुष्याची गाडी आपल्यासोबत अनेक भावनांच्या प्रवाशी लोकांना आपल्यासोबत घेऊन प्रवास करत असते.
रखरखत ऊन असो वा वळवाचा पाऊस या भावनांना सुखरूप आपल्या ठिकाणी पोहचवण्याचे काम हे जीवन करत असते.
या प्रवासाच्या दरम्यान सगळ्यात महत्वाची भूमिका बजवतो तो म्हणजे “आपुलकी” नावाचा “कंडक्टर”.
आणि या “कंडक्टर” ची व्यापकता सिद्ध करतात ते “तिकिटरूपी शब्द”.10
या शब्दांची किम्मत ही आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर वेगवेगळ्या स्वरुपात बदलते.
ह्याच शब्दांच्या किमयेतून मी साकारत आहे तरुणाईच्या मनातील नवीन क्षितिजे.
व्यक्त आणि अव्यक्त, बोल आणि अबोल भावनांचा संगम साधून विविध दृष्टांताद्वारे आपल्या आयुष्यातील अंतरंगाचे धन प्रकाशित करून जीवनातील सौंदर्याचे एकापेक्षा एक अनोखे नमुने सादर करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.